मरठ आरमरच भरतय नदलवरल परभव
Abstract
प्रसिध्द मराठी साहित्यिक आचार्य अत्रे म्हणतात “इतर राज्यांना भूगोल आहे,पण महाराष्ट्राला इतिहास आहे!” महाराष्ट्राचा इतिहास इथल्या मातीच्या शौर्याची साक्ष सांगतो. शिछत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकाच्या मध्यावर स्वराज्य निर्मिती केली. स्वराज्याला बळकटी आणण्यासाठी अनेक बलस्थाने निर्माण केली. त्या बलस्थानांचे एक महत्वाचे अंग म्हणजे मराठा आरमार निर्मिती. मराठा आरमाराने समुद्रावर आपल्या अस्तित्वाबरोबर आपल्या वर्चस्वाची स्थापना केली. मराठा आरमारामुळे स्वराज्याला संपन्नता, समृद्धता, संरक्षितता, सामर्थ्य प्रदान झाले. स्वराज्याला आरमाराने स्थिर आधार दिला. स्वराज्याच्या मुलखातील व्यापार-उदिमाला प्रोत्साहन मिळाले, समुद्रपर्यटन निषिद्ध मानणाऱ्या भारतीय उपखंडातील जहाजे आता व्यापारासाठी साता-समुद्रापार जाऊ लागली. तसेच अनेकांना आपल्या गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यातून जगाच्या इतिहासावर आपला ठसा उमटवणारी अनेक गुणरत्ने उदयास आली. या मराठा आरमाराच्या उदयाच्या पार्श्वभूमीचा व आजच्या भारतीय नौदलावरील प्रभावाचा अभ्यास प्रस्तुत शोध निबंधात केला आहे.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 1 January 2026
- Language
- MR