परयवरणय कतसठ समजक नवकलपन आण वरतनतमक बदल
Abstract
मानवाच्या उत्पत्ती पासून माणसाने वेगवेगळे शोध लावले. या शोधामधून अनेक विकासाच्या वाटा शोधल्या गेल्या आहेत. अश्मयुगातील मानव व आधुनिक युगातील मानव यांच्या राहणीमानात, संस्कृतीत, विचार शैलीत आणि सामाजिक विकासात फारच मोठा बदल झालेला आहे. हा बदल मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर केलेला आहे. निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे बुद्धी होय. या बुद्धीच्या सहकार्याने अनेक विकासात्मक बदल मानवाने केलेले आहेत. हे बदल करीत असताना पर्यावरणाचा ऱ्हास अति जास्त प्रमाणात केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आता आधुनिक काळात जाणवत आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून पर्यावरणाचा समतोल राखून सामाजिक, भौतिक विकास साध्य करणे गरजेचे आहे. यासाठी काही सामाजिक नवकल्पना आणि वर्तनात्मक बदल करणे. सर्व सजीव सृष्टीच्या व नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरामध्ये काटकसर करून सुयोग्य वापर करणे गरजेचे आहे. पर्यावरण कृतीसाठी सामाजिक नवकल्पना तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या नवीन पद्धतीचा वापर करून पर्यावरण पूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे. वर्तनात्मक बदल म्हणजे लोकांच्या सवयी व विचार आणि कृतीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे. जेणेकरून हवामान बदल प्रदूषण कमी होईल आणि संसाधनाच्या शाश्वत वापर होईल. यामुळे सामाजिक व पर्यावरणीय स्थिरता साधण्यास मदत होईल.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026