सवततरयततर कलखडतल महलचय जवनतल बदलत करतजयत सवतरबई फल यच मरठ सहतय व करय यगदन
Abstract
सदर शोधनिबंधात स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महिलांच्या जीवनातील बदलांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मराठी साहित्य व सामाजिक कार्याचे योगदान अभ्यासले आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून महिलांना आत्मभान, स्वावलंबन व सामाजिक जाणीव प्राप्त करून दिली. पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनवले. बालविवाह, सतीप्रथा, केशवपन, जातिभेद व स्त्री शोषण यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध त्यांनी प्रत्यक्ष कृती व लेखनाच्या माध्यमातून संघर्ष केला. ‘काव्यफुले’ आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या साहित्यकृतींमधून त्यांनी स्त्री-पुरुष समता, शिक्षणाचे महत्त्व, मानवी मूल्ये, सामाजिक न्याय व विद्रोही चेतना प्रभावीपणे मांडली. त्यांच्या साहित्याला सामाजिक प्रबोधनाची धार असून ते स्त्रीवादी आणि बहुजनवादी विचारधारेचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरते. तसेच १८९७ च्या प्लेगच्या साथीत केलेले त्यांचे सेवाकार्य हे त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचे श्रेष्ठ उदाहरण आहे. एकूणच, सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक परिवर्तनाला दिशा मिळाली, असा निष्कर्ष या अभ्यासातून मांडण्यात आला आहे.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 7 January 2026