सवततरयततर भरततल धरमनरपकषतसदरभतल परवरतन : यश, आवहन आण पढल वटचल
Abstract
सदर शोधनिबंधात स्वातंत्र्योत्तर भारतातील धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेतील परिवर्तन, त्याचे यश, उद्भवलेली आव्हाने आणि भावी वाटचाल यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय समाज हा बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक व विविधतेने नटलेला असल्याने राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी धर्मनिरपेक्षता हे मूलभूत मूल्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतीय संविधानाने राज्यसंस्थेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्वीकारून सर्व धर्मांप्रती समभाव, सहिष्णुता व विवेकनिष्ठ राज्यकारभाराची अपेक्षा व्यक्त केली आहे. या अभ्यासात धर्म आणि राज्यसंस्था यांच्यातील परस्परसंबंध, धर्मनिरपेक्षतेची पाश्चात्य व भारतीय संकल्पना, संविधानातील तरतुदी आणि न्यायालयीन भूमिकांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकारणात धर्माचा वाढता हस्तक्षेप, धार्मिक असहिष्णुता, ध्रुवीकरण, तुष्टीकरणाचे राजकारण आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक दरी यांचे चिकित्सक विश्लेषण करण्यात आले आहे. शोधनिबंधातून असे स्पष्ट होते की, धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाची अंमलबजावणी प्रत्यक्ष व्यवहारात अनेकदा अपुरी ठरलेली दिसते. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्ये धोक्यात येत आहेत. निष्कर्षतः, भारतासारख्या विविधतापूर्ण राष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी विवेकाधारित राजकारण, शिक्षणाद्वारे जनजागृती आणि सर्वसमावेशक राज्यकारभाराची नितांत आवश्यकता असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026