रजचय आहरतल पलभजयच आयरवद व आधनक दषटकनतन अधययन
Abstract
सदर शोधनिबंधात रोजच्या आहारातील पालेभाज्यांचे आयुर्वेदिक तसेच आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सविस्तर अध्ययन करण्यात आले आहे. निरोगी व संतुलित जीवनासाठी आहाराचे महत्त्व अधोरेखित करत पालेभाज्यांमधील पोषणमूल्ये, औषधी गुणधर्म व त्यांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यांचे विश्लेषण केले आहे. आयुर्वेदातील रस, विपाक, वीर्य व गुण या संकल्पनांच्या आधारे धान्यक (कोथिंबीर), मेथिका (मेथी), पालक, चुक्रिका (आंबटचुका), नागवेल (विड्याचे पान), पूतिहा (पुदिना) व कैडर्य (कढीपत्ता) या पालेभाज्यांचे दोषांवरील परिणाम, औषधी उपयोग व रोगनिवारणातील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच आधुनिक संशोधनाच्या आधारे या पालेभाज्यांमधील जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, अँटीऑक्सिडंट्स व जैवसक्रिय घटक यांचे आरोग्यदायी फायदे मांडण्यात आले आहेत. पालेभाज्यांचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, रक्तवाढ होते, हाडे मजबूत राहतात तसेच मधुमेह, हृदयविकार, स्थूलता व काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, हे या अभ्यासातून स्पष्ट होते. निष्कर्षतः, आयुर्वेद व आधुनिक विज्ञान या दोन्हींच्या समन्वयातून पालेभाज्यांचा समावेश दैनंदिन आहारात करणे हे सुदृढ, निरोगी व दीर्घायुषी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे या शोधनिबंधातून अधोरेखित करण्यात आले आहे.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026