ततरजञनच असथवयग दवयगवयकतवर परणम - एक अधययन

Read full text
Authors: ज्ञानेश्वर संतोष माळी, ज्ञानेश्वर काशिनाथ भामरे
Cited by: 0

Abstract

सदर संशोधनात तंत्रज्ञानाचा अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व मानसिक परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. आधुनिक कृत्रिम अवयव, सहाय्यक उपकरणे, डिजिटल तंत्रज्ञान व ऑनलाईन सुविधा यांमुळे अस्थिव्यंग व्यक्तींच्या स्वावलंबनात, रोजगाराच्या संधींमध्ये व सामाजिक सहभागात लक्षणीय वाढ झाली आहे. संशोधनासाठी धुळे जिल्ह्यातील १८ वर्षांवरील ५० अस्थिव्यंग व्यक्तींचा नमुना निवडून वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास करण्यात आला. निष्कर्षांवरून असे स्पष्ट होते की तंत्रज्ञानामुळे आत्मविश्वास, आत्मसन्मान व जीवनमान उंचावले असले तरी ग्रामीण-शहरी असमानता, साधनांची उपलब्धता व आर्थिक अडचणी ही आव्हाने अद्याप कायम आहेत. त्यामुळे समावेशक समाजनिर्मितीसाठी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

Fields of Study & Subjects

Disability Rights and Representation Assistive Technology in Communication and Mobility Digital Accessibility for Disabilities

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 January 2026