समजक नयय, वचर व समजरचनत महलच भरतय सवधनतल यगदन

Read full text
Authors: अस्मिता धनवंत सरवैया
Cited by: 0

Abstract

वैदिक काळ स्त्रियांच्या दृष्टीने सुवर्ण युग काळ होता, असे मत अनेकांनी मांडले आहे. प्राचीन, प्रारंभिक मध्ययुगीन, मुस्लिम कालखंड, शिवशाही व पेशवाईत सर्वसामान्य स्त्रिया व विधवा कशा जगल्या, त्यांच्यावर कोणते अत्याचार व जुलूम झालेत, होत होते, त्यावेळेसच्या रूढी परंपरांचे त्यांना पालन करावे लागले, अशा विस्तृत संदर्भ घेवून संशोधन पेपर तयार करण्यात आला आहे. समाज जिवंत ठेवण्याची अनन्यसाधारण क्षमता असलेल्या या भारतीय संविधानात फुलेंचा उदारमतवादी आणि धर्माच्या कृतिशील चिकित्सेचा विधायक दृष्टिकोन, शाहूंचा समानतेचा आग्रह, गांधींची अहिंसा, नेहरूंचं समाजकारण आणि राजकारण; त्याचबरोबर आंबेडकरांचा अभ्यास, वैचारिक मांडणी, शोषण व्यवस्थेविरुद्धची चीड आणि मानवमुक्तीचा ध्यास, या सर्वच गोष्टी प्रतिबिंबित होतात. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह असलेल्या 296 सदस्यांपैकी 15 सदस्य या महिला होत्या, की ज्यांनी घटना समितीच्या सर्वच चर्चासत्रांमध्ये अनेक विषयांवर सांगोपांग चर्चा करून निर्भीडपणे मते मांडली. त्यांनी मांडलेल्या अनेक सूचना पुढे जाऊन घटनेच्या कलमांमध्ये परावर्तित झाल्या. परंतु काही कारणांमुळे या महिलांचे राज्यघटनेच्या जडणघडणीतील योगदान दुर्लक्षितच राहिले. 15 भारतीय महिलांबद्दल ज्यांनी संविधान निर्मितीत आपले अमूल्य योगदान दिले आहे.

Fields of Study & Subjects

South Asian Studies and Diaspora Gender and Feminist Studies Gender Politics and Representation

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 January 2026