भरतय सवततरय चळवळत परकय महलच यगदन
Abstract
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही केवळ भारतीय नेतृत्वापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्वरूपाची चळवळ होती. या चळवळीत अनेक परकीय महिलांनी वैचारिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय पातळीवर सक्रिय सहभाग घेतला. भारतीय राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये, मानवतावाद आणि सामाजिक न्याय या विचारांनी प्रेरित होऊन या महिलांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांनी संघटनांची स्थापना, लेखन-भाषणे, वृत्तपत्रे, शिक्षणप्रसार, महिला संघटन, क्रांतिकारकांना मदत व थेट आंदोलनातील सहभाग अशा विविध माध्यमांतून भारतीय स्वातंत्र्य चळवळ गतिमान केली. भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान व राष्ट्रीय नेतृत्वाच्या विचारांचा प्रभाव स्वीकारून त्यांनी भारतालाच आपली कर्मभूमी मानली. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या यशात परकीय महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण व अविस्मरणीय ठरले आहे.
Fields of Study & Subjects
Colonial History and Postcolonial Studies
Historical Gender and Feminism Studies
South Asian Studies and Diaspora
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026