नवडणक सधरण: एक जगतक दषटकन
Abstract
लोकशाहीची प्रभावीता आणि वैधता टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व समावेशक असणे अत्यावश्यक आहे. भारतासह अनेक लोकशाही देशांमध्ये निवडणूक सुधारणांचा उद्देश गुन्हेगारीकरण, पैशाचा वाढता प्रभाव, राजकीय निधीतील अपारदर्शकता, पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव आणि तांत्रिक आव्हाने यांवर मात करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतील मतदान हक्क कायदे, युनायटेड किंग्डममधील प्रतिनिधित्व सुधारणा आणि जर्मनीतील मिश्र-सदस्य प्रणाली यांमधून निवडणूक प्रक्रियेचे विविध नमुने दिसून येतात. भारतात मतदानाचे वय कमी करणे, EVM व NOTAची अंमलबजावणी, दलबदल विरोधी कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय यांमुळे निवडणूक प्रक्रियेत सुधारणा घडून आल्या आहेत. तथापि, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, जबाबदार आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी राज्यनिधीतून निवडणुका, एकाच वेळी निवडणुका, निवडणूक आयोगाचे बळकटीकरण आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या दिशेने व्यापक व शाश्वत सुधारणांची आवश्यकता आहे.
Fields of Study & Subjects
Electoral Systems and Political Participation
Political Dynamics in Latin America
Political Theory and Democracy
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026