हवमन बदल आण समजवरल परणम Climate Change and Its Impact on Society
Abstract
हवामान बदल हा 21व्या शतकातील सर्वात मूलभूत जागतिक प्रश्न मानला जातो. औद्योगिकीकरणाच्या प्रक्रिये नंतर वातावरणातील हरितगृह वायूंची वाढ, पृथ्वीचे तापमान वाढणे, पर्जन्यमानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्तीची तीव्रता व वारंवारता वाढणे या स्वरूपात हवामान बदलाचे परिणाम समाजशास्त्रीय दृष्टीने अधिक गंभीर ठरू लागले आहेत. या संशोधनाचा उद्देश हवामान बदलामुळे सामाजिक संरचनेवर, आर्थिक असमानतेवर, आरोग्य-संकटांवर, स्थलांतरावर, लिंग-संबंधांवर, कृषी उत्पादनावर आणि पर्यावरणीय न्यायावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणे हा आहे. यामध्ये गुणात्मक (Qualitative) सामाजिक संशोधनाच्या आधारे विविध राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय अहवाल, आकडेवारी, संशोधन निबंध व केस स्टडींच्या आधारे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. अध्ययनात निदर्शनास येते की हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम गरीब, वंचित, ग्रामीण व किनारपट्टीवरील समाजघटकांवर होतो. पर्यावरणीय धोरणे, शाश्वत विकास आणि सामाजिक न्याय यांचा संतुलित अभ्यास हवामान बदलावर मात करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
Fields of Study & Subjects
Climate Change and Environmental Impact
Climate Change and Sustainable Development
Climate Change Communication and Perception
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026