भरतय सवधन मलयचय परपरकषयतन ततयपथयच वसतव

Read full text
Authors: प्रतिमा नारायणराव आसले
Cited by: 0

Abstract

भारतीय संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांवर आधारित असून ते देशातील सर्व नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान करते. ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथी समुदायासाठी भारतीय संविधान आणि न्यायालयीन निर्णयांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. या लेखात भारतीय संविधानातील मूल्यांच्या परिप्रेक्ष्यातून तृतीयपंथीयांचे सामाजिक वास्तव, त्यांचे हक्क, स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणाचा अभ्यास करण्यात आला आहे. संविधानातील कलम 14, 15, 19 आणि 21 तसेच NALSA विरुद्ध भारत सरकार (2014), नवतेज सिंग जोहर (2018) आणि तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, 2019 या निर्णय व कायद्यांमुळे तृतीयपंथी व्यक्तींना कायदेशीर ओळख, समानता, आत्मओळख, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या संविधानात्मक तरतुदींमुळे तृतीयपंथी समुदाय समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागला असून शिक्षण, रोजगार व सामाजिक प्रतिष्ठेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. निष्कर्षतः भारतीय संविधान हे तृतीयपंथी व्यक्तींच्या मानवी प्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि सर्वांगीण सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरले आहे.

Fields of Study & Subjects

Religious Freedom and Discrimination Judicial and Constitutional Studies Comparative constitutional jurisprudence studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026