मनव हकक आण भरतय सवधन
Abstract
मानवी हक्क म्हणजे प्रत्येक व्यक्तीस जन्मतः प्राप्त होणारे मूलभूत अविभाज्य व सार्वत्रिक अधिकार होत. मानवी हक्क ही संकल्पना मानवाच्या प्रतिष्ठा, स्वातंन्न्य व समानतेवर आधारीत आहे. मूलतः लोकशाही शासन व्यवस्थेचा पाया मानवी हक्कांच्या संरक्षणावरच ऊभा असतो. मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक हक्कांच्या सिध्दांतातून विकसीत झाली आहे. मानवी हक्क हे सर्व व्यक्तींना असणारे मूलभूत अधिकार आहेत. मानवी हक्क ही संकल्पना मानवाच्या जन्मसिध्द प्रतिष्ठा, स्वतंन्न्य व समतेवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीला केवळ मानव म्हणून काही मूलभूत अधिकार आसतात ज्यांचे संरक्षण राज्याने करणे आवश्यक आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत लिखित संविधान असून त्यामध्ये मानवी हक्कांचे व्यापक स्वरूपात संरक्षण करण्यात आले आहे. भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च कायदा आहे. भारतीय संविधानामध्ये प्रकरण तीन मध्ये कलम 12 ते 35 च्या दरम्यान मूलभूत हक्क/अधिकांरांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील गोरगरीब, दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, आल्पसंख्यांक, स्त्रिया यांचे प्रश्न आजही तितकेच तीव्र स्वरूपाचे आहेत असे दिसून येते. म्हणून भारतातील प्रत्येक व्यक्तीचे संविधानाने दिलेले मानवी हक्क आबाधित ठेऊन योग्य अंमल करून सर्वांना समान न्याय देऊन मानवी हक्क आयोगाने तसेच शासनाने कार्य केले तरच भारतातील जनता सुखी व समाधानी होईल. या शोधनिबंधामध्ये मानवी हक्काची संकल्पना, भारतीय संविधानातील मूलभूत हक्क यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
Fields of Study & Subjects
Legal Rights and Human Rights
Comparative constitutional jurisprudence studies
Ombudsman and Human Rights
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026