भरतय समजवर जगतककरणच परणम

Read full text
Authors: आश्विनी गौतम चांदमारे
Cited by: 0

Abstract

जागतिकीकरण ही आधुनिक काळातील एक महत्त्वाची आणि बहुआयामी सामाजिक प्रक्रिया असून तिचा भारतीय समाजावर व्यापक परिणाम झालेला आहे. १९८० नंतरच्या आर्थिक सुधारणांमुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकरूप झाला. या संशोधन लेखात जागतिकीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्था, सामाजिक-सांस्कृतिक जीवन आणि शिक्षण क्षेत्रावर झालेल्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. जागतिकीकरणामुळे परदेशी गुंतवणूक, औद्योगिक विस्तार, सेवा क्षेत्राची वाढ, रोजगार संधी आणि GDP मध्ये वाढ झाली; मात्र त्याचबरोबर उत्पन्नातील विषमता, ग्रामीण-शहरी दरी, लघु व कुटीर उद्योगांचे नुकसान आणि शेती क्षेत्रावरील ताण वाढला आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मानवाधिकार, स्त्री-पुरुष समानता आणि शिक्षणाच्या संधी वाढल्या असल्या तरी पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, उपभोगवाद आणि स्थानिक मूल्यांचे क्षरणही दिसून येते. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित शिक्षण, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कौशल्यविकासाला चालना मिळाली; परंतु शिक्षणाचे व्यापारीकरण व असमानता ही गंभीर आव्हाने ठरली आहेत. एकूणच जागतिकीकरण ही अटळ प्रक्रिया असून तिचे लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समतोल व समावेशक धोरणांची आवश्यकता आहे.

Fields of Study & Subjects

Globalization and Cultural Identity Indian Economic and Social Development Globalization Economics and Policies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026