शतकर चळवळ समरल आवहन
Abstract
शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य, सावकारी कर्ज, जागतिकीकरण, शेतमालाच्या किमतीत घट, किंमत व उत्पादन खर्चातील तफावत, कौटुंबिक उदासीनतेचे वातावरण, शेतमालाची कमी किंमतीला होणारी आयात, अपुरी सिंचन व्यवस्था, निसर्गाची अवकृपा, कुशल राजकीय नेतृत्वाचा अभाव, पाश्चात्य संस्कृतीच्या अभावाने बळकावलेला ग्रामीण भागातील व्यक्तिवाद, नियोजनकर्त्याचे शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष, बँकांची नफेखोरी वृत्ती, शेतकऱ्यांमधील अशिक्षितपणा, शासकीय मदतीच्या मार्गातील औदासीन्य, महत्त्वपूर्ण समस्यांवर जुजबी इलाज इत्यादी समस्यांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी चळवळी ग्रामीण स्तरावर लोकांच्या संपर्कात राहून तणावशोषण यंत्रणेच्या स्वरूपात काही योगदान देवू शकतील काय? याचाही विचार महत्वाचा ठरतो. परंपरागत स्वरूपाच्या तणावशोषण यंत्रणांचे विघटन झाले, परंतु त्याची जागा घेण्यास नवीन यंत्रणा मात्र निर्माण झाल्या नाहीत. ही उणीव भरून काढणाऱ्या यंत्रणा समोर येणे गरजेचे आहे.
Fields of Study & Subjects
Agriculture
Land Use
Rural Development
Agricultural Economics and Practices
Rural Development and Agriculture
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026