मनवधकर चळवळ

Read full text
Authors: विलास कऱ्हाळे
Cited by: 0

Abstract

मानवाधिकार ही मानवी जीवनाशी निगडित अशी व्यापक व मूलभूत संकल्पना आहे. मानवाला सन्मानाने, स्वातंत्र्याने व सुरक्षिततेने जीवन जगता यावे यासाठी दिलेले हक्क म्हणजे मानवाधिकार होत. विसाव्या शतकापासून विशेषतः संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर मानवाधिकारांना जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले. प्राचीन ग्रीक-रोमन संस्कृती, पर्शियन सम्राट सायरसचा जाहीरनामा, मॅग्ना कार्टा, फ्रेंच व अमेरिकन क्रांती यांमधून मानवाधिकारांचा ऐतिहासिक विकास झाला. भारतामध्ये प्राचीन काळापासून मानवाधिकारांची जाणीव आढळते. सम्राट अशोकाच्या धोरणांपासून आधुनिक काळातील समाजसुधारकांच्या चळवळींपर्यंत मानवाधिकारांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न झाले. सतीप्रथा बंदी, बालविवाह विरोध, अस्पृश्यता निर्मूलन, स्वातंत्र्य चळवळ आणि भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे मानवाधिकार चळवळीचे महत्त्वाचे टप्पे आहेत. 1948 चा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार जाहीरनामा, भारतीय संविधान, मानवाधिकार संरक्षण कायदा 1993 तसेच विविध राष्ट्रीय आयोगांद्वारे भारतात मानवाधिकारांचे संरक्षण व अंमलबजावणी केली जाते. तथापि, आजही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांपासून अनेक लोक वंचित आहेत. त्यामुळे मानवाधिकार चळवळीसमोर अजूनही मोठी आव्हाने उभी आहेत.

Fields of Study & Subjects

Legal Rights and Human Rights Historical and Contemporary Political Dynamics International Law and Human Rights

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026