जगतककरणनतर भरततल शतमलचय वयपरच वकस

Read full text
Authors: कैलास दिलीप जाधव
Cited by: 0

Abstract

1991 च्या आर्थिक संकटाचा भाग भारतात नवीन आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला गेला.त्याचा परिणाम म्हणून भारतात उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण सुरू करण्यात आले.एकविसाव्या शतकात भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाले.भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.या शेती व्यवसायावर देखील जागतिकीकरणाचे अनेक परिणाम झाले. जागतिकीकरणाचा भारतीय शेतमालाच्या आयात निर्यातीवर देखील परिणाम झाला.जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक करारामुळे शेतमालाची आयात निर्यात खुली झाली.जागतिक स्तरावर भारत हा जगातील प्रमुख कृषी वस्तूंच्या निर्यातीत मोडतो जागतिकीकरणा नंतर भारताचा जागतिक कृषी निर्यात व आयात व्यापारात हिस्सा बदलत गेलेला आहे. पूर्वीपासूनच, भारत चहा, कॉफी, तंबाखू, साखर, कोको, सुतीकपडे, ज्युट, कच्ची लोकर, वनस्पती तेल इत्यादी पारंपारिक वस्तूंची निर्यात करीत आहे अलीकडे कृषी वस्तूंच्या आयात- निर्यातीच्या आकारमान विस्तारले आहे. भारत गहू. तांदूळ यासारख्या अन्नधान्यांबरोबरच फळे व फुलांची ही निर्यात करीत आहे. 1990- 91 पासून भारताचे एकूण आयातीमध्ये शेती व तत्सम वस्तूंच्या आयातीचे प्रमाण दोन ते सहा टक्के च्या दरम्यान बदलत राहिलेले आहे, तर एकूण निर्यातीत कृषी व तत्सम वस्तूंच्या निर्यातीचे प्रमाण दहा ते वीस टक्के च्या दरम्यान बदलत राहिले आहे. त्यामुळे जागतिकीकरणानंतर भारतातील शेतमालाच्या आयात - निर्यातीत कसे बदल झाले हे समजून घेणे आवश्यक ठरते.

Fields of Study & Subjects

Agricultural Economics and Practices Agricultural economics and policies Globalization Economics and Policies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026