महलच रजकय सहभग व महलसबधत धरण

Read full text
Authors: अविनाश पांचाळ, प्रमोद राऊत
Cited by: 0

Abstract

प्रस्तुत संशोधन लेखात महाराष्ट्रातील महिलांचा राजकीय सहभाग आणि राज्य शासनाने राबविलेल्या महिला-संबंधित धोरणांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारकांनी केलेल्या कार्यामुळे महिलांना शिक्षण, सामाजिक जाणीव व सार्वजनिक जीवनात सहभागाची संधी मिळाली. स्वातंत्र्य चळवळीत महिलांच्या सक्रिय सहभागामुळे आत्मविश्वास वाढला; तथापि, स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय सत्तेतील महिलांचे प्रतिनिधित्व अपेक्षित प्रमाणात वाढलेले दिसून येत नाही. महाराष्ट्र विधानसभा व लोकसभा निवडणुकांतील आकडेवारी पाहता महिलांचे प्रतिनिधित्व अद्याप कमी असून मतदानातील सहभागही समाधानकारक नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १९९४, २००१, २०१४ आणि २०२४ अशी चार महिला धोरणे राबविली आहेत. या धोरणांमधून महिलांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व कायदेशीर सक्षमीकरण, लिंगसमानता, हिंसाचार प्रतिबंध, रोजगार, कौशल्य विकास आणि सर्वसमावेशक विकास यांवर भर देण्यात आला आहे. विशेषतः चौथ्या महिला धोरणात ‘लैंगिक समानता’, ‘Leave No One Behind’ ही संकल्पना आणि LGBTQIA+ घटकांचा समावेश हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. लेखाच्या समारोपात असे नमूद केले आहे की, केवळ धोरणे व कायदे पुरेसे नसून त्यांची प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक मानसिकतेत बदल आणि सर्व घटकांचा समावेश केल्यासच महिलांचा खरा राजकीय व सामाजिक विकास साध्य होऊ शकतो.

Fields of Study & Subjects

Gender Politics and Representation Gender and Feminist Studies Historical Gender and Feminism Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026