सकलगर जमतचय बल भषच लपतपरयत: समसय, करण आण सवरधन
Abstract
सिकलीगर ही भारतातील एक भटकी जमात असून तिची स्वतंत्र बोली भाषा आहे. या जमातीवर मराठी, हिंदी, पंजाबी, उर्दू, राजस्थानी, मारवाडी आणि राज्य भाषानिहाय प्रभाव पडलेला असल्यामुळे या भाषेला संमिश्र स्वरूप प्राप्त झाले आहे. ही बोली भाषा त्यांच्या जीवनशैली, व्यवसाय, धार्मिक श्रद्धा, लोकसाहित्य आणि सांस्कृतिक परंपरेशी घट्ट बांधलेली आहे. मात्र, बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे प्रमाणभाषांचा प्रभाव आणि स्थलांतरामुळे ही बोली भाषा लुप्तप्राय अवस्थेत पोहोचली आहे. समाजमाध्यमांमुळेही अत्यंत महत्त्वाची ही भाषा दुर्लक्षित होताना दिसत आहे. प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश सिकलीगरी बोली भाषेच्या लुप्तप्रायतेचे कारणे, सामाजिक व शैक्षणिक समस्या, तसेच तिच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्नांची गरज आहे. संशोधनासाठी क्षेत्रीय अभ्यास, मुलाखती, सहभाग निरीक्षण आणि दुय्यम साधने यांचा वापर केलेला आहे. वृद्ध व तरुण पिढीमधील भाषिक फरक, भाषेचा वापर, पारंपरिक व्यवसाय व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे विश्लेषण केले गेले. युवा वर्गाचा प्रामुख्याने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचा वापर वाढला आहे, परिणामी सिकलीगरी बोली भाषेचा नैसर्गिक वारसा लुप्त होत आहे. याकरिता भाषेचे दस्तऐवजीकरण, मातृभाषा-आधारित शिक्षण, लोककथा, गाणी व म्हणींचे संकलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. बोली भाषेचे संवर्धन म्हणजे केवळ भाषिक अस्तित्वाचे जतन नसून त्या समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण करणे होय. सिकलीगरी बोली भाषा टिकवणे म्हणजे भटक्या जमातीच्या जीवनशैली, ज्ञानपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाला न्याय देणे होय. यामुळे भाषिक संवर्धनासाठी शासकीय भाषा संस्थांनी उपाययोजना आणि समाजजागृती करणे आवश्यक आहे.
Fields of Study & Subjects
Linguistic and Sociocultural Studies
Language and Culture
Multilingual Education and Policy
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026