भरतय रजयघटन आण मनव अधकर
Abstract
भारतीय संसदेने मानवाधिकारासंदर्भात अनेक कायदे निर्माण केले असले तरी सर्व हक्कांविषयी समाजात फारशी जागृती झालेली आढळत नाही. विशेषत: दुर्बुल घटकांच्या व स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली होताना दिसते. भारतात मानवी हक्कांबद्दल जागृती नसल्याची जी कारणे आहेत, त्यामध्ये नागरिकांचे अज्ञान, लोकसंख्या वाढ आणि साधनांची कमतरता ही कारणे अधिक महत्त्वाची मानवी लागतील. मानवी हक्कांच्या संरक्षण व अंमलबजावणीसाठी सध्या असलेली यंत्रणा अत्यंत तुटपुंज्या साधनांनिशी कार्यरत आहेत.देशातील सर्व राज्यांत मानवी हक्क आयोग स्थापन केले पाहिजेत, मानवी हक्क आयोगाचे सध्या जे जिल्हा प्रतिनिधी कार्यरत आहे त्यांना प्रशिक्षण, संपर्क सुविधा, कार्यालयीन व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मानवी प्रतिष्ठा, रोजगार, पर्यावरण, आरोग्य व शिक्षण यांचे ज्या प्रमाणात उल्लंघन होते त्यांचा मानवी हक्क आयोगाने अभ्यास करून न्यायालयात अशा व्यक्तींचे प्रतिनिधित्व करावे. जेणेकरून दुर्बल घटकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण मानवी हक्क आयोग अधिक समर्थपणे करू शकेल.
Fields of Study & Subjects
Legal Rights and Human Rights
Ombudsman and Human Rights
South Asian Studies and Conflicts
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026