आदवस समजच रजकय आण समजक यगदन वशष सदरभ नदड जलह 2020 त 2025
Abstract
प्रस्तुत संशोधन लेखात नांदेड जिल्ह्याच्या विशेष संदर्भात (2020–2025) आदिवासी समाजाचे राजकीय व सामाजिक योगदान यांचा अभ्यास करण्यात आला आहे. आदिवासी समाज हा भारताचा मूळ निवासी असून जल, जंगल व जमीन यांचे संवर्धन करणारा समाज म्हणून ओळखला जातो. भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमाती म्हणून ओळख मिळाल्यानंतर घटनात्मक तरतुदी, आरक्षण व्यवस्था तसेच 73 व्या घटनादुरुस्तीमुळे आदिवासी समाजाला राजकीय सहभाग व प्रतिनिधित्वाची संधी प्राप्त झाली. तथापि, शिक्षणाचा अभाव, आर्थिक मागासलेपणा, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक अडचणी यांमुळे त्यांचा प्रभावी राजकीय सहभाग मर्यादित राहिल्याचे दिसून येते. या अभ्यासात आदिवासी समाजाच्या राजकीय सहभागाचा, सामाजिक नेतृत्वाचा, सांस्कृतिक वारशाचा व घटनात्मक तरतुदींच्या अंमलबजावणीचा अभ्यास वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीने करण्यात आला आहे. आदिवासी समाजाने राष्ट्रउभारणीत सहभाग, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, स्थानिक स्वराज्य संस्थांतील सहभाग, पारंपारिक न्यायव्यवस्था, संघटनात्मक कार्य तसेच पर्यावरण संरक्षण, पारंपरिक ज्ञान व सांस्कृतिक जतन यांद्वारे महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान दिले आहे. निष्कर्षतः, आदिवासी समाजाचे राजकीय व सामाजिक योगदान भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, आरोग्य, प्रभावी अंमलबजावणी व सहभागी धोरणांची आवश्यकता आहे.
Fields of Study & Subjects
Indigenous Cultures and History
South Asian Studies and Conflicts
Social and Economic Development in India
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026