भरततल नवडणक परकरयत परदरशकत आण सधरण

Read full text
Authors: अविनाश पांचाळ
Cited by: 0

Abstract

भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेली निवडणूक प्रक्रिया मुक्त, नि:पक्ष आणि पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या निवडणुका तुलनेने निष्पक्ष झाल्या असल्या, तरी कालांतराने पैशाची ताकद, जात-धर्माधारित राजकारण, गुन्हेगारीकरण, घराणेशाही व सत्तेचा गैरवापर यांमुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक सुधारणांची गरज अधिक तीव्र झाली आहे. सदर लेखात भारतीय निवडणूक व्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने, त्यांचे परिणाम आणि त्यावर उपाय म्हणून सुचविलेल्या सुधारणा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपीएटीची पारदर्शक पडताळणी, बनावट मतदारांवर नियंत्रण, राज्य निधीतून निवडणुका, सक्तीचे मतदान, इ-मतदान प्रणाली, प्रमाणशीर प्रतिनिधित्व, तसेच भारतीय निवडणूक आयोगाचे स्वायत्तीकरण या उपाययोजना लोकशाही अधिक मजबूत करू शकतात. योग्य अंमलबजावणी झाल्यास निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास वाढून भारतीय लोकशाहीची अखंडता दीर्घकाळ टिकू शकते.

Fields of Study & Subjects

Electoral Systems and Political Participation Political Theory and Democracy Political Dynamics in Latin America

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026