सतर मकत चळवळत पडत रमबईच यगदन
Abstract
एकोणिसावे शतक हे भारतीय समाजात सामाजिक व धार्मिक प्रबोधनाचे युग ठरले. याच काळात स्त्रीमुक्ती चळवळीचा उदय झाला आणि त्यात पंडिता रमाबाई यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालपणापासून विद्वत्ता, आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचारसरणी लाभलेल्या रमाबाईंनी स्त्रियांच्या शिक्षण, स्वातंत्र्य व आत्मसन्मानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. बालविवाह, विधवांचे हाल, पुनर्विवाहावरील निर्बंध, कर्मठ परंपरा आणि पुरुषप्रधान मानसिकता यांविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. ‘आर्य महिला समाज’, ‘शारदासन’, ‘मुक्तिसदन’ यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विधवा, अनाथ व पीडित स्त्रियांना आश्रय, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेची संधी उपलब्ध करून दिली. स्त्री शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि स्त्री-पुरुष समानता याबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते. राष्ट्रीय चळवळीतही त्यांनी सहभाग घेऊन स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न उपस्थित केला. परंपरा आणि कर्मठतेला विरोध करून स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या पंडिता रमाबाई या भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व ठरतात.
Fields of Study & Subjects
South Asian Studies and Diaspora
Historical Gender and Feminism Studies
Gender and Feminist Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026