भरत आण G20: भमक आण आवहन
Abstract
G20 या जागतिक मंचावर भारताने एक जबाबदार, समावेशक व दूरदृष्टी असलेला नेता म्हणून आपली भूमिका बजावली आहे. विकसनशील देशांच्या समस्या जागतिक स्तरावर मांडणे, जागतिक आर्थिक स्थैर्य, दारिद्र्यनिर्मूलन, हवामान बदल, शाश्वत विकास आणि डिजिटल परिवर्तन यावर भारताने विशेष भर दिला. “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वाच्या आधारे भारताने जागतिक सहकार्य, शांतता आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश दिला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, वित्तीय समावेशन, महिलांचे सशक्तीकरण आणि जागतिक दक्षिणेच्या अपेक्षा अधोरेखित करणे ही भारताची महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. 2023 मध्ये G20 अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारताने “One Earth, One Family, One Future (वसुधैव कुटुंबकम्)” या तत्त्वावर आधारित जागतिक सहकार्याचा संदेश दिला. तथापि, विकसित व विकसनशील देशांमधील हितसंबंधांचा समतोल, जागतिक राजकीय तणाव, हवामान बदलाबाबत जबाबदारीचा प्रश्न, कर्ज वाटप व कर्ज संकट ही भारतासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. एकूणच, G20 हे भारतासाठी केवळ आर्थिक मंच नसून जागतिक धोरणे आकारण्यासाठी, संवाद वाढवण्यासाठी आणि समताधिष्ठित जागतिक व्यवस्था घडवण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ ठरले आहे.
Fields of Study & Subjects
International Relations and Foreign Policy
Indian Economic and Social Development
Globalization
Economics
and Policies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026