नवडणक परकरयत परदरशकत आण सधरण
Abstract
या शोध निबंधामध्ये भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व त्यामधील आवश्यक सुधारणांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या निवडणुकांची अंमलबजावणी पारदर्शक, नि:पक्ष व विश्वासार्ह नसेल तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थाच संकटात येऊ शकते. भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन स्वायत्तता बहाल केली असली तरी अलीकडच्या काळात निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक शंका व प्रश्न उपस्थित झाले आहेत. या लेखात EVM व VVPAT संदर्भातील विश्वासार्हता, पेड न्यूज, सोशल मीडियाचा गैरवापर, गुन्हेगारीकरण, पैशाचा अमर्याद वापर, आचारसंहितेचे उल्लंघन तसेच NOTA च्या मर्यादा यांसारख्या समस्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी तांत्रिक सुधारणा, कायद्यांची कठोर अंमलबजावणी, गुन्हेगारांना निवडणूक लढविण्यापासून रोखणे आणि निवडणूक आयोगाची स्वायत्त व निर्भय भूमिका अत्यंत आवश्यक असल्याचे या संशोधनातून स्पष्ट होते. लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून नागरिक, प्रसारमाध्यमे व घटनात्मक संस्थांचा जबाबदार सहभाग महत्त्वाचा आहे.
Fields of Study & Subjects
Electoral Systems and Political Participation
Administrative Law and Governance
Judicial and Constitutional Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026