गरमण वकसत सवयसव ससथच भमक

Read full text
Authors: राजू शेषराव पोपळघट
Cited by: 0

Abstract

या लेखामध्ये ग्रामीण विकास प्रक्रियेत स्वयंसेवी संस्थांची (अशासकीय संस्था) भूमिका, महत्त्व आणि कार्यपद्धती यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. भारत हा विकसनशील देश असून ग्रामीण भागात दारिद्र्य, बेरोजगारी, अशिक्षण, आरोग्यसेवांचा अभाव, पायाभूत सुविधांची कमतरता, अंधश्रद्धा व सामाजिक विषमता यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात. या समस्यांवर मात करण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणा पुरेशी ठरत नसून स्वयंसेवी संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. महात्मा गांधींच्या रचनात्मक कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था ग्रामस्वच्छता, शिक्षण, आरोग्य, महिला व आदिवासी कल्याण, ग्रामोद्योग, स्वावलंबन आणि सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात सक्रिय झाल्या आहेत. या संस्थांची स्वायत्तता, लोकसहभाग, नेतृत्व, कार्यकुशलता आणि लवचिकता ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये असून त्या शासनाच्या विकास कार्यक्रमांना पूरक ठरतात. मध्यस्थ, सल्लागार, संशोधन, पायाभूत सुविधा विकास, ऐच्छिक कृती आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणे या विविध भूमिका स्वयंसेवी संस्था पार पाडतात. ग्रामीण विकास ही सर्वसमावेशक प्रक्रिया असून शासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्यातील समन्वय, सहकार्य व परस्परपूरक सहभागातूनच शाश्वत ग्रामीण विकास साध्य होऊ शकतो, हे या लेखातून स्पष्ट होते.

Fields of Study & Subjects

Social and Economic Development in India Religion Society and Development Community and Sustainable Development

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026