सवधन परसतवक : लकशह मलयच आतम

Read full text
Authors: बने रेखा रामनाथ
Cited by: 0

Abstract

या लेखामध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे (Preamble) स्वरूप, तत्त्वज्ञान व लोकशाही मूल्यांतील मध्यवर्ती स्थान यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटना ही केवळ कायदे व तरतुदींचा संग्रह नसून स्वातंत्र्यलढ्यातून आणि सामाजिक परिवर्तनाच्या आकांक्षांतून साकार झालेला जिवंत दस्तऐवज आहे. या संपूर्ण राज्यघटनेचा आत्मा प्रस्ताविकेत प्रतिबिंबित होतो. प्रस्ताविका भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करून राज्याचे स्वरूप स्पष्ट करते. प्रस्ताविकेत न्याय (सामाजिक, आर्थिक व राजकीय), स्वातंत्र्य (विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व उपासना), समता (दर्जा व संधीची समानता) आणि बंधुता (व्यक्तीचा सन्मान व राष्ट्राची एकता) या मूलभूत लोकशाही मूल्यांचा स्वीकार करण्यात आला आहे. “आम्ही भारताचे लोक” या शब्दांतून लोकसत्तेचा मूलाधार अधोरेखित केला आहे. प्रस्ताविका ही मूलभूत हक्क, राज्याच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये यांना दिशा देणारी आहे. केशवानंद भारती प्रकरणानंतर प्रस्ताविकेला संविधानाच्या मूलभूत रचनेचा आधार मानले गेले असून सामाजिक परिवर्तन, राष्ट्रीय एकता व लोकशाही सुदृढीकरणासाठी तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यामुळे प्रस्ताविका ही भारतीय संविधानाचा खरा आत्मा व लोकशाही मूल्यांची मार्गदर्शक ठरते.

Fields of Study & Subjects

Public Administration and Governance American Constitutional Law and Politics Comparative constitutional jurisprudence studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026