भरतचय शजर रषटरतल रजकय उठव

Read full text
Authors: बी.व्ही. आंधळे
Cited by: 0

Abstract

या लेखामध्ये भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या राजकीय उठावांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान, मालदीव आणि पाकिस्तान या देशांतील राजकीय, आर्थिक व सामाजिक अस्थिरतेची कारणे आणि परिणाम यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. आर्थिक संकट, युवकांचे आंदोलन, लोकशाहीतील आव्हाने, परकीय हस्तक्षेप, धार्मिक कट्टरतावाद आणि सत्तांतर या घटकांमुळे या देशांत राजकीय उलथापालथ झाली. या घडामोडींचा भारताच्या अंतर्गत व परराष्ट्र धोरणावर थेट परिणाम झाला आहे. भारताने शेजारी राष्ट्रांबाबत ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरण, संयम, मानवीय मदत आणि राजनैतिक समतोल राखत आपली भूमिका बजावली आहे. भारत @2047 महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना शेजारी राष्ट्रांतील स्थैर्य भारतासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.

Fields of Study & Subjects

Political Conflict and Governance South Asian Studies and Conflicts Politics and Conflicts in Afghanistan Pakistan and Middle East

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026