रषटरय शकषणक धरण आण इतहस

Read full text
Authors: निकिता बाबासाहेब जाधव
Cited by: 0

Abstract

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (एनईपी 2020) हे एकविसाव्या शतकातील शिक्षणव्यवस्थेचे मार्गदर्शक धोरण असून ते सर्वसमावेशक, लवचीक, बहुविषयक आणि मूल्याधारित शिक्षणावर भर देते. या संशोधन लेखामध्ये एनईपी 2020 आणि इतिहास या विषयातील परस्परसंबंधाचा अभ्यास करण्यात आला आहे. इतिहास विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये, नागरिकत्व, सामाजिक जबाबदारी, लोकशाही दृष्टीकोन, संविधानिक मूल्ये आणि सांस्कृतिक वारसा यांची जाणीव निर्माण करता येते, हे या अभ्यासातून स्पष्ट होते. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतातील समाजसुधारक, संत, विचारवंत, स्वातंत्र्यलढे व संविधान निर्मिती यांचा अभ्यास एनईपीच्या उद्दिष्टांना पूरक ठरतो. इतिहास शिक्षणामुळे तर्कशुद्ध विचार, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सर्वसमावेशकतेची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतात. त्यामुळे ‘विकसित भारत’ आणि जागतिक पातळीवरील सक्षम नागरिक घडविण्यासाठी इतिहास विषयाची भूमिका एनईपी 2020 मध्ये अत्यंत महत्त्वाची असल्याचे निष्कर्षातून अधोरेखित होते.

Fields of Study & Subjects

Educator Training and Historical Pedagogy Values and Moral Education Education and Cultural Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026