इतहस लखनतल नवपरवह वशष सदरभ: वचतच इतहस
Abstract
प्रस्तुत लेखामध्ये इतिहास लेखनातील नवप्रवाह म्हणून उदयास आलेल्या सबाल्टर्न (वंचितांचा) इतिहास लेखन या संकल्पनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. परंपरागत इतिहास लेखनात राजे, सत्ताधीश, अभिजन वर्ग आणि नेतृत्वकर्ते यांच्यावर भर दिला गेला; मात्र सामान्य जनता, शेतकरी, कामगार, आदिवासी, सैनिक आणि इतर वंचित घटकांचे योगदान मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिले. या उणिवेची जाणीव सबाल्टर्न इतिहास लेखन प्रवाहाने करून दिली. इंग्लंडमध्ये History from Below या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवाह भारतात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रुजला. डॉ. रणजीत गुहा यांच्या नेतृत्वाखाली सबाल्टर्न स्टडीजच्या माध्यमातून भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा मिळाली. ॲन्टोनिओ ग्रामची यांच्या विचारसरणीचा प्रभाव या लेखनावर दिसून येतो. या प्रवाहामुळे वंचित, दुर्लक्षित आणि तळागाळातील समाजघटकांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय योगदान इतिहासाच्या केंद्रस्थानी आले. त्यामुळे इतिहास लेखन अधिक सर्वसमावेशक, वास्तववादी आणि न्याय्य झाले असून इतिहासाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे.
Fields of Study & Subjects
Philosophy
History
and Historiography
South Asian Studies and Diaspora
Educator Training and Historical Pedagogy
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026