समरजयवद आण वसहतवद यच मनव जवनवर झलल परणम:- एक अवलकन
Abstract
साम्राज्यवाद आणि वसाहतवाद या संकल्पनांनी जगाच्या इतिहासात मानवी समाजावर दूरगामी परिणाम घडवून आणले आहेत. प्रस्तुत लेखामध्ये प्राचीन काळातील साम्राज्य विस्तारापासून ते आधुनिक काळातील युरोपीय वसाहतवादापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास विशद करण्यात आला आहे. रोमन, मौर्य व इस्लामिक साम्राज्यांच्या माध्यमातून झालेला सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक आणि वैचारिक विस्तार तसेच त्याचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम या अभ्यासात मांडले आहेत. आधुनिक काळात युरोपीय राष्ट्रांनी आशिया, आफ्रिका व अमेरिका खंडांमध्ये वसाहती स्थापन करून नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण, आर्थिक पिळवणूक, धर्मप्रसार आणि राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. तथापि, साम्राज्यवाद व वसाहतवादामुळे भौतिक सुधारणा, दळणवळणाची साधने, शिक्षणाचा प्रसार, वैचारिक जागृती व नव्या नेतृत्वाचा उदय हे सकारात्मक परिणामही घडून आले. याचबरोबर गुलामगिरी, आर्थिक शोषण, नीतीमूल्यांचा ऱ्हास, सांस्कृतिक व धार्मिक वर्चस्व यांसारखे अनिष्ट परिणाम मानवी जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे ठरले. त्यामुळे साम्राज्यवाद व वसाहतवाद हे मानवी समाजाच्या विकास आणि विनाश या दोन्ही अंगांनी अभ्यासण्याजोगे असल्याचे या लेखातून स्पष्ट होते.
Fields of Study & Subjects
Colonial History and Postcolonial Studies
African history and culture studies
Legal and cultural studies analysis
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026