गरमण कदबर आण लकजवन
Abstract
प्रस्तुत लेखात ग्रामीण कादंबरी आणि लोकजीवन यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. ग्रामीण कादंबरी ही ग्रामीण समाजाच्या जीवनाचे वास्तववादी प्रतिबिंब असून ती खेड्यातील शेतीप्रधान संस्कृती, निसर्गाशी असलेले नाते, लोकमानस, श्रद्धा-अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, सण-उत्सव आणि सामाजिक-आर्थिक संघर्ष यांचे प्रभावी चित्रण करते. ग्रामीण कादंबऱ्यांमधील पात्रे निसर्गसन्मुख, सोशिक, श्रद्धाळू आणि दैववादी वृत्तीची असल्याचे दिसून येते. दुष्काळ, गरिबी, कर्जबाजारीपणा, स्थलांतर, सहकार क्षेत्रातील शोषण तसेच ग्रामीण स्त्रीचे स्थान यांसारख्या प्रश्नांचे यथार्थ दर्शन या कादंबऱ्यांतून घडते. ग्रामीण लेखक स्वतः त्या मातीचे संस्कार घेऊन आलेला असल्याने त्याच्या लेखनात लोकजीवनाची अस्सल अनुभूती प्रत्ययास येते. लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि ग्रामीण कादंबरी यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत हा लेख ग्रामीण समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे आणि मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे ग्रामीण कादंबरी ही केवळ साहित्यकृती न राहता ग्रामीण समाजजीवनाचा सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज ठरते.
Fields of Study & Subjects
Literature: history
themes
analysis
Folklore
Mythology
and Literature Studies
Literary Analysis and Cultural Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026