मरठ लकससकतचय उपसकच सदयसथत

Read full text
Authors: उज्वला शिवराम जगताप
Cited by: 0

Abstract

प्रस्तुत लेखामध्ये मराठी लोकसंस्कृतीच्या उपासकांची सद्यस्थिती यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. लोकसंस्कृती ही समाजाच्या जीवनपद्धतीची, श्रद्धा-परंपरांची, रूढी-प्रथांची आणि लोकमानसाची अभिव्यक्ती असून ती मुख्यतः मौखिक परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आली आहे. गोंधळी, वासुदेव, वाघ्या-मुरळी, पांगुळ, पोतराज, भराडी, भोपे, बहुरूपी, धनगर इत्यादी लोकसंस्कृतीचे उपासक लोकगीत, लोककथा, विधी, जागरणे आणि नाट्यात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन, मनोरंजन व सांस्कृतिक जतन करीत आले आहेत. मात्र २१व्या शतकातील जागतिकीकरण, आधुनिकीकरण, शहरीकरण, विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव, प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव आणि बदलती सामाजिक-आर्थिक स्थिती यांमुळे या उपासकांच्या परंपरांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेक लोकपरंपरा लुप्त होत असून नव्या पिढीचा सहभाग कमी होत चालला आहे. परिणामी लोकसंस्कृतीच्या उपासकांचे अस्तित्व, मान्यता व उपजीविकेचे प्रश्न गंभीर बनले आहेत. या अभ्यासातून असे स्पष्ट होते की मराठी लोकसंस्कृतीचे संवर्धन व जतन करण्यासाठी लोकसंस्कृतीच्या उपासकांना सामाजिक सन्मान, शासकीय पाठबळ, अभ्यासकांचे मार्गदर्शन आणि जनजागृतीची नितांत गरज आहे. अन्यथा ही समृद्ध लोकपरंपरा काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता आहे.

Fields of Study & Subjects

Cultural and Sociopolitical Studies Cultural Heritage Management and Preservation Cultural and Mythological Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026