धरमनरपकषत आण आधनक आवहन
Abstract
प्रस्तुत लेखात धर्मनिरपेक्षता आणि आधुनिक आव्हाने या विषयाचा सखोल व चिकित्सक विचार करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली धर्मनिरपेक्षता ही केवळ ‘सर्वधर्मसमभाव’ इतक्यावर मर्यादित नसून ती शासन व धर्म यांच्या कार्यक्षेत्रातील स्पष्ट विभाजन, नागरिकांचे समान हक्क, विवेकवाद, इहवादी जीवनदृष्टी आणि मानव्यनिष्ठ मूल्यांवर आधारित आहे. मात्र आधुनिक काळात जातिवाद, सांप्रदायिकता, धार्मिक मूलतत्त्ववाद, बहुसंख्यवाद, मतपेटीचे संधिसाधू राजकारण तसेच तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांची दुटप्पी भूमिका यांमुळे धर्मनिरपेक्षतेसमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. लेखात भारतीय राज्यघटनेतील कलमे, घटनादुरुस्त्या, पं. जवाहरलाल नेहरूंची भूमिका तसेच ‘इहवाद’ आणि ‘सर्वधर्मसमभाव’ यांतील संकल्पनात्मक गोंधळ यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनात धर्माचा अतिरेक, धार्मिक सण-समारंभांचे राजकीयीकरण आणि शासनयंत्रणेचा त्यातील सहभाग यामुळे लोकशाही व धर्मनिरपेक्षतेची मूल्ये कमकुवत होत असल्याचे लेखातून स्पष्ट होते. लेखाचा निष्कर्ष असा आहे की खरी धर्मनिरपेक्षता ही धर्मविरोधी नसून मानव्यनिष्ठ, विवेकाधिष्ठित आणि समताधिष्ठित जीवनदृष्टी आहे. ती प्रभावी होण्यासाठी राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनी संधिसाधूपणा टाळून संविधानिक मूल्यांचे प्रामाणिक पालन करणे आवश्यक आहे.
Fields of Study & Subjects
Religion and Society Interactions
Religious Freedom and Discrimination
Indian and Buddhist Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026