मरठवडयतल मरठ वचरक सहतय
Abstract
मराठवाड्यातील मराठी वैचारिक साहित्य ही एक समृद्ध, व्यापक आणि परिवर्तनवादी परंपरा आहे. विचार हे मानवी जीवनाचे, व्यक्तिमत्त्वाचे व समाजपरिवर्तनाचे मूलभूत अधिष्ठान असून वैचारिक साहित्य विचार, विवेक, तर्क, मूल्यचिंतन आणि सामाजिक भान जागविण्याचे कार्य करते. स्वातंत्र्यपूर्व काळात या साहित्याने अन्यायकारक सत्तेविरुद्ध जनजागृती व स्वातंत्र्यकांक्षा निर्माण केली; तर स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रश्नांवर चिकित्सक भाष्य करत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. मराठवाड्यातील वैचारिक साहित्यिकांनी धर्म, जात, वर्ग, लिंग, शिक्षण, लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय, समता, विज्ञाननिष्ठा आणि परिवर्तनवादी चळवळी यांचा सखोल विचार मांडला आहे. या साहित्याने समाजमन घडविणे, सामाजिक चळवळींना वैचारिक बळ देणे आणि अन्याय-अत्याचाराविरुद्ध विवेकाधिष्ठित संघर्षाची प्रेरणा देणे हे महत्त्वाचे कार्य केले आहे. प्रज्ञावंत विचारवंतांच्या लेखनातून समाजपरिवर्तनाची दिशा स्पष्ट होत असून मराठवाड्याचे वैचारिक साहित्य मराठी साहित्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देते.
Fields of Study & Subjects
South Asian Studies and Diaspora
Literature: history
themes
analysis
Historical and Literary Analyses
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026