सथनक इतहस लखनतल मखक इतहसच महतव
Abstract
आजच्या जागतिकीकरण व तंत्रज्ञानप्रधान युगात सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बदल वेगाने घडत असून त्याचा परिणाम स्थानिक परंपरा, स्मृती, बोलीभाषा व सांस्कृतिक ओळखीवर होत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक इतिहास लेखनात मौखिक इतिहासाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित होते. इतिहास ही केवळ राजे-राण्या, युद्धे किंवा राजकीय घडामोडींची नोंद नसून तो मानवी समाजाच्या सर्वांगीण जीवनाची कहाणी आहे. स्थानिक इतिहास लेखनाद्वारे एखाद्या गावाचा किंवा प्रदेशाचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक विकास अभ्यासता येतो. मौखिक इतिहासाच्या माध्यमातून लोकांच्या आठवणी, अनुभव, लोककथा, लोकगीते, परंपरा, रूढी व जीवनशैली जतन केली जाते. स्थानिक संघर्ष, सामाजिक-राजकीय चळवळी, स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग यांची माहिती बहुतेकदा मौखिक स्रोतांतूनच उपलब्ध होते. त्यामुळे दुर्लक्षित राहिलेल्या घटना, सामान्य लोकांचे अनुभव आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्यास मौखिक इतिहास मदत करतो. स्थानिक इतिहास लेखन व मौखिक इतिहास या परस्परपूरक पद्धती असून त्यांचा एकत्रित अभ्यास इतिहासाला अधिक समृद्ध, सुसंगत व सर्वसमावेशक बनवतो.
Fields of Study & Subjects
Oral History
Memory
Narrative Analysis
Philosophy
History
and Historiography
Autobiographical and Biographical Writing
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026