आधनक वदयकय कषतरतल नतमतत

Read full text
Authors: Swati Nagorao Kulkarni
Cited by: 0

Abstract

भारतीय संस्कृतीत मानवी जीवन व आरोग्याला सर्वोच्च स्थान देण्यात आले असून वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभाव, त्याग व नैतिकतेवर आधारित मानला जातो. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मोठी प्रगती झाली असली, तरी वैद्यकीय नीतिमत्ता ही डॉक्टर–रुग्ण–समाज यांच्यातील विश्वासाचा कणा आहे. चरकसंहिता व सुश्रुतसंहिता यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये वैद्यकीय नीतिमत्तेची स्पष्ट मांडणी आढळते. रुग्णहित सर्वोपरी, गोपनीयता, समानता यांसारख्या मूल्यांवर वैद्यकीय आचारसंहिता आधारित आहे. स्वायत्तता, परोपकार, अपाय न करणे व न्याय हे वैद्यकीय नीतिमत्तेचे चार प्रमुख सिद्धांत आधुनिक काळातही महत्त्वाचे आहेत. मात्र जनुकीय संपादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टेम सेल संशोधन, इच्छामरण, सरोगसी, वैद्यकीय व्यवसायिकरण, उपचारातील असमानता व वैद्यकांचे विषम वितरण यांसारख्या अनेक नैतिक समस्या उद्भवत आहेत. भारतीय दृष्टिकोनातून वैद्यकीय नीतिमत्ता ही ‘सेवा परमो धर्मः’ या मूल्यावर आधारित असून समाजकल्याणासाठी नीतिनिष्ठ वैद्यकीय व्यवहार अत्यावश्यक आहे.

Fields of Study & Subjects

Ethics and bioethics in healthcare Health Medicine and Society Medical and Health Sciences Research

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026