उदयजक सहभगतन महलच आरथक सबलकरण:एक बहआयम अभयस
Abstract
महिलांचे आर्थिक सबलीकरण हे शाश्वत विकासाचे महत्त्वाचे अंग आहे, कारण आर्थिकदृष्ट्या सबल महिला कुटुंब आणि समाजाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावतात. उद्योजकता ही आर्थिक सबलीकरणाची प्रभावी साधन असून स्वयंरोजगार, लघुउद्योग आणि सूक्ष्म उद्योजकतेत महिलांचा सहभाग वाढत आहे. या संशोधनात उद्योजक सहभागामुळे महिलांचे उत्पन्न, बचत, आर्थिक निर्णयक्षमता, संसाधनांवरील नियंत्रण आणि स्वायत्तता यावर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. प्राथमिक माहिती प्रश्नावली व मुलाखतीद्वारे, तसेच दुय्यम माहिती संशोधन लेख व अहवालातून संकलित करण्यात आली. निष्कर्षांनुसार उद्योजक सहभागामुळे महिलांचे उत्पन्न, बचत क्षमता, गुंतवणूक आणि निर्णयक्षमता वाढते, तसेच आत्मविश्वास व सामाजिक प्रतिष्ठा सुधारते; मात्र भांडवल, प्रशिक्षण, सामाजिक रूढी आणि कौटुंबिक जबाबद्या हे मुख्य अडथळे आहेत.
Fields of Study & Subjects
Microfinance and Financial Inclusion
Gender
Labor
and Family Dynamics
Entrepreneurship Studies and Influences
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026