भरतय लकशहच समजकलन सवरप, आवहन आण उपययजन
Abstract
भारतीय लोकशाही ही संविधानावर आधारित, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व प्रजासत्ताक स्वरूपाची असून जगातील सर्वात मोठी प्रतिनिधीक लोकशाही आहे. स्वातंत्र्यानंतर संविधानिक तरतुदी, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, बहुपक्षीय व्यवस्था, स्वतंत्र न्यायपालिका व निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून लोकशाही भक्कम करण्यात आली आहे. मात्र बदलत्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीत भारतीय लोकशाहीसमोर राजकीय भ्रष्टाचार, निवडणूक प्रक्रियेतील दोष, जातीय व धार्मिक राजकारण, सामाजिक-आर्थिक विषमता, प्रसार माध्यमांचा गैरवापर, घटनात्मक संस्थांवरील दबाव, नागरिकांचा निष्क्रिय सहभाग, अंतर्गत सुरक्षा समस्या आणि केंद्र-राज्य संबंधांतील तणाव अशी अनेक समकालीन आव्हाने उभी आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी घटनात्मक संस्थांचे बळकटीकरण, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, निवडणूक सुधारणा, लोकशाही मूल्यांचे शिक्षण, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विकास या उपाययोजना अत्यावश्यक आहेत. या मार्गांनीच भारतीय लोकशाही अधिक सुदृढ व समृद्ध होऊ शकते.
Fields of Study & Subjects
Political Theory and Democracy
Public Administration and Governance
Indian Economic and Social Development
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026