यव पढ आण रजकय नततवतल नव परवह : एक वशलषणतमक अभयस

Read full text
Authors: नारायण फुन्ने, बी.बी. लोखंडे
Cited by: 0

Abstract

समकालीन काळात युवा पिढी आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील नातेसंबंध झपाट्याने बदलत आहेत. शिक्षणाचा विस्तार, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव, सामाजिक माध्यमांची वाढ, तसेच जागतिकीकरणामुळे निर्माण झालेले नवीन सामाजिक-आर्थिक प्रश्न यांमुळे युवा पिढीचे राजकारणाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले आहेत. पारंपरिक राजकीय संरचना आणि नेतृत्वशैलींपेक्षा पारदर्शकता, उत्तरदायित्व, समावेशकता आणि सहभागात्मक लोकशाही या मूल्यांना युवा पिढी अधिक महत्त्व देत आहे. हा अभ्यास युवा पिढीच्याराजकीय सहभागाचे स्वरूप, नेतृत्वातील नवे प्रवाह, तसेच युवकांनी स्वीकारलेल्या नव्या राजकीय अभिव्यक्तींचे विश्लेषण करतो. युवक संघटना, विद्यार्थी चळवळी, सामाजिक माध्यमांवरील राजकीय सक्रियता आणि नव्या पिढीतील नेत्यांची उदयास येणारी भूमिका यांचा सखोल ओळख आधारित राजकारण यांसारख्या आव्हानांचा त्यांच्या राजकीय सहभागावर होणारा परिणामही स्पष्ट केला आहे.अभ्यासातून असे आढळते की, युवा पिढी केवळ मतदार म्हणून मर्यादित न राहता धोरणनिर्मिती, जनआंदोलन आणि नेतृत्वनिर्मितीमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय नेतृत्व अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही होण्याची शक्यता आहे. हा अभ्यास लोकशाही प्रक्रियेतील युवकांच्या वाढत्या भूमिकेचे आकलन करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Fields of Study & Subjects

Youth Politics and Society Sociopolitical Dynamics in Russia Generational Differences and Trends

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026