कमरड शरद पटल यचय वचरच परसगकत: मरकसवद आण आबडकरवद

Read full text
Authors: फुके, व्ही. एल,, भारत डिगांबर पवार
Cited by: 0

Abstract

भारतीय समाजरचनेचे विश्लेषण करताना जात, वर्ग आणि लिंग या शोषण संरचनांचा परस्परसंबंध समजून घेणे अत्यावश्यक ठरते. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय डाव्या चळवळींनी प्रामुख्याने वर्गसंघर्षावर भर दिला; तर जातिविरोधी चळवळी सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांपुरत्या मर्यादित राहिल्या. या दोन्ही प्रवाहांतील तात्त्विक दरी ओळखून कॉम्रेड शरद पाटील यांनी मार्क्सवाद, आंबेडकरवाद आणि स्त्रीवादी विचार यांचे मूलगामी संधान घडवून आणले. प्रस्तुत लेखात कॉ. शरद पाटील यांच्या राजकीय विचारांची सैद्धांतिक चौकट, भारतीय मार्क्सवादावरील त्यांची टीका, जात ही उत्पादनपद्धती म्हणून मांडलेली संकल्पना आणि आजच्या नवउदारवादी व हिंदुत्ववादी राजकारणाच्या संदर्भात त्यांच्या विचारांची प्रासंगिकता यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. भारतीय समाजरचना ही एका जटिल आणि बहुस्तरीय शोषणव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. या व्यवस्थेत जात, वर्ग आणि लिंग या तीनही सूत्रांच्या अंतर्गूढ परस्परसंबंधातून शोषणाची एकत्रित संरचना (Intersectionality) निर्माण झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक चळवळींनी या त्रिसूत्री संरचनेकडे पुरेसे संपूर्ण दृष्टिकोनातून पाहिले नाही. डाव्या राजकारणाचा केंद्रबिंदू प्रामुख्याने आर्थिक वर्गसंघर्ष होता, तर जातीय न्यायाच्या चळवळी प्रायः सामाजिक-सांस्कृतिक पुनर्गठनापुरत्याच मर्यादित राहिल्या. अशा परिस्थितीत कॉम्रेड शरद पाटील (१९२५-२०१४) यांनी केलेले विश्लेषण आणि प्रतिपादन हे भारतीय प्रगतिशील विचारसरणीत एक मूलगामी वळण म्हणून ओळखले जाते. त्यांनी मार्क्सवाद, आंबेडकरवाद आणि स्त्रीवादी विचारसरणी यांच्यातील दिसणाऱ्या विरोधाभासांऐवजी त्यांच्या पूरकतेवर भर दिला आणि भारतीय शोषणव्यवस्थेचे संपूर्ण आकलन करून तिच्यावरील संघर्षाची एकात्मिक तात्विक चौकट प्रस्तुत केली.

Fields of Study & Subjects

South Asian Studies and Diaspora Indian History and Philosophy Marxism and Critical Theory

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026