भरतचय पररषटर धरणचय ववध पलच चकतसक अभयस
Abstract
प्रस्तुत लेखात भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विविध पैलूंचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. प्रत्येक देशाचे परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय हितसंबंधांवर आधारित असते आणि भारतही याला अपवाद नाही. भौगोलिक स्थान, नैसर्गिक संसाधने, तंत्रज्ञान, आर्थिक स्थिती तसेच शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध या घटकांच्या आधारे भारताने आपले परराष्ट्र धोरण निश्चित केले आहे. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अंतर्गत विकासाबरोबरच बाह्य आव्हानेही होती. या पार्श्वभूमीवर पंचशील करार, लाहोर करार आणि विशेषतः अलिप्ततावादी धोरण स्वीकारून भारताने महासत्तांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वतंत्र भूमिका घेत जागतिक राजकारणात आपले सार्वभौमत्व टिकवून ठेवले. शीतयुद्धानंतर बदललेल्या जागतिक परिस्थितीत भारताचे परराष्ट्र धोरण अधिक गतिमान आणि परिवर्तनशील झाले आहे. अमेरिका, रशिया, जपान यांसारख्या देशांशी संबंध दृढ करताना तसेच क्वाडसारख्या प्रादेशिक गटांमध्ये सहभाग घेत भारताने धोरणात्मक सहकार्य वाढवले आहे. चीन व पाकिस्तानकडून निर्माण होणाऱ्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्करी क्षमता आणि संरक्षण तंत्रज्ञानावरही भर देण्यात आला आहे. परराष्ट्र धोरण हे गुंतागुंतीचे, परस्परावलंबी आणि बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार विकसित होणारे क्षेत्र आहे. राष्ट्रीय हितसाधन, शांततापूर्ण सहअस्तित्व, असंलग्नता आणि पंचशील यांसारखी तत्त्वे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये ठरतात. जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत करण्यासाठी आणि उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी परराष्ट्र धोरण आवश्यक असल्याचे लेखातून स्पष्ट होते.
Fields of Study & Subjects
International Relations and Foreign Policy
South Asian Studies and Conflicts
Global Political and Social Dynamics
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026