नरनळ कलल आण परयटन वयवसयचय सध
Abstract
नरनाळा किल्ला हा विदर्भातील अकोला जिल्ह्यातील एक प्राचीन, विशाल व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण किल्ला असून त्याचा इतिहास बहमनी, इमादशाही, मुघल, मराठा व ब्रिटिश कालखंडाशी निगडित आहे. किल्ल्याची भव्य तटबंदी, दरवाजे, बुरुज, तलाव व स्थापत्यवैशिष्ट्ये ही तत्कालीन स्थापत्यकलेची साक्ष देतात. इतका समृद्ध ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा असूनही किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या अपेक्षित विकास झालेला नाही. आधुनिक काळात पर्यटन हे रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास व सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाचे प्रभावी माध्यम ठरले आहे. नरनाळा किल्ला ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहसी, नैसर्गिक व इको-टुरिझमसाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देतो. मेळघाट टायगर रिझर्व्हच्या सान्निध्यामुळे वन्यजीवन निरीक्षण, ट्रेकिंग, फोटोग्राफी व निसर्गभ्रमंती यांना चालना मिळू शकते. योग्य नियोजन, पायाभूत सुविधांचा विकास, स्थानिकांचा सहभाग, मार्गदर्शक प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्था तसेच डिजिटल प्रचार केल्यास नरनाळा किल्ला पर्यटन व्यवसायाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनू शकतो. अशा शाश्वत पर्यटन विकासामुळे ऐतिहासिक वारशाचे जतन होऊन स्थानिक समाजाच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीस हातभार लागेल.
Fields of Study & Subjects
Archaeology and Cultural Heritage
Diverse Aspects of Tourism Research
Urbanism
Landscape
and Tourism Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026