जलन जलहयतल मदर आण धरमक परयटन

Read full text
Authors: मोतीराम विठ्ठलराव कदम
Cited by: 0

Abstract

भारत हा सांस्कृतिक, ऐतिहासिक व नैसर्गिक वैविध्याने समृद्ध देश असून पर्यटन हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. पर्यटनामुळे रोजगारनिर्मिती, परकीय चलनप्राप्ती आणि पायाभूत सुविधांचा विकास घडून येतो. तथापि, केवळ आर्थिक वाढीवर केंद्रीत पर्यटन विकासामुळे पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक विषमता आणि स्थानिक संस्कृतीवर दबाव निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शाश्वत विकासाच्या चौकटीत पर्यटन धोरणांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. प्रस्तुत अभ्यासात भारतातील राष्ट्रीय पर्यटन धोरणे (१९८२, २००२ व २०१५ मसुदा) आणि त्यांचा शाश्वत विकासाशी असलेला संबंध चिकित्सक दृष्टीने विश्लेषित करण्यात आला आहे. या धोरणांमध्ये शाश्वत, समावेशक व जबाबदार पर्यटनाचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक मर्यादा दिसून येतात. आर्थिक लाभांचे असमान वितरण, स्थानिक समुदायांचा मर्यादित सहभाग, पर्यावरणीय वहनक्षमता दुर्लक्षित होणे आणि धोरणे व अंमलबजावणी यांतील दरी ही प्रमुख समस्या आहेत. योग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक लोकसहभाग आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधल्यास पर्यटन धोरणे भारताच्या शाश्वत विकासात प्रभावी भूमिका बजावू शकतात.

Fields of Study & Subjects

Religious Tourism and Spaces Diverse Aspects of Tourism Research Geotourism and Geoheritage Conservation

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026