मरठवडयतल जयतरलग: धरमक परयटनच ऐतहसक आढव
Abstract
मराठवाडा प्रदेशाला प्राचीन काळापासून समृद्ध असा धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव या राजवटींच्या काळात येथे कला, स्थापत्य व धर्मसंस्कृतीचा लक्षणीय विकास झाला. मराठवाड्यातील औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ व वेरूळ येथील घृष्णेश्वर ही तीन ज्योतिर्लिंगे भारतातील बारा प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी असून, ती हेमाडपंथीय स्थापत्यशैलीची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या मंदिरांच्या निर्मिती, रचना, जिर्णोद्धार व धार्मिक महत्त्वाचा ऐतिहासिक आढावा घेणे हा या संशोधन लेखाचा मुख्य उद्देश आहे. या ज्योतिर्लिंगांमुळे मराठवाड्याच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळाली असून, प्रदेशाच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ज्योतिर्लिंगे ही केवळ श्रद्धेची केंद्रे नसून ती धार्मिक पर्यटन व ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहेत.
Fields of Study & Subjects
Religious Tourism and Spaces
Indian and Buddhist Studies
Travel Writing and Literature
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026