गडच रज आण रजच गड
Abstract
रायगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेतील दुर्गम, नैसर्गिक संरक्षण लाभलेला आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २७०० फूट उंचीवर वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. शिलाहार, यादव, बहामनी व आदिलशाही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिंकून त्याचा भव्य विस्तार केला. हिरोजी इंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी, दरवाजे, राजवाडे, तलाव व मंदिरांची उभारणी करण्यात आली. आज रायगडावर अनेक वास्तूंचे अवशेष दिसून येतात; मात्र काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर त्यांची पडझड झालेली आहे. रायगड हा केवळ एक ऐतिहासिक किल्ला नसून स्वराज्य, न्याय, शौर्य व प्रेरणेचे प्रतीक आहे. या किल्ल्याचे संवर्धन व जतन करणे ही वर्तमान आणि भावी पिढ्यांची ऐतिहासिक जबाबदारी आहे.
Fields of Study & Subjects
Cultural Heritage Management and Preservation
Archaeology and Cultural Heritage
Architecture and Cultural Influences
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026