परयटकभमख परयटन

Read full text
Authors: जी. पी. भालेराव
Cited by: 0

Abstract

काळानुरूप पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून पर्यटन हे केवळ विरंगुळ्याचे साधन न राहता एक व्यापक सेवा उद्योग म्हणून उदयास आले आहे. पर्यटनाचे स्वरूप भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण, कृषी, वैद्यकीय, साहसी व खाद्य पर्यटन अशा विविध प्रकारांत विस्तारले आहे. विविध देशांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्ती, सांस्कृतिक वारसा व सेवा सुविधा विकसित करून पर्यटन उद्योगातून आर्थिक बळकटी साधण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिकीकरणामुळे पर्यटन क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून काही देशांनी परकीय चलन प्राप्तीसाठी देहव्यावसायिक (सेक्स) पर्यटनास कायदेशीर मान्यता दिली आहे. मात्र या प्रकारच्या पर्यटनामुळे सामाजिक, नैतिक व आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवत असल्याचेही आढळते. भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देशात देहव्यवसायीक पर्यटनास कायदेशीर मान्यता नसून नैतिकता व मानवी हक्कांच्या संरक्षणावर भर देण्यात आला आहे. सदर शोधनिबंधात पर्यटनाचे विविध प्रकार, विविध देशांची पर्यटनधोरणे, देहव्यवसायीक पर्यटनाचे स्वरूप, कायदेविषयक भूमिका व त्याचे सकारात्मक-नकारात्मक परिणाम यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

Fields of Study & Subjects

Diverse Aspects of Tourism Research Community-based Tourism Development and Sustainability Urbanism Landscape and Tourism Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026