भरतय परयटन एक ऐतहसक वरस

Read full text
Authors: लक्ष्मीकांत मारुतीराव जिरेवाड
Cited by: 0

Abstract

पर्यटन हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून प्राचीन काळापासून मनोरंजन, ज्ञानवर्धन, धार्मिक, सांस्कृतिक व व्यावसायिक उद्देशाने मानव पर्यटनाकडे आकर्षित झाला आहे. काळानुरूप पर्यटनाचे स्वरूप बदलत गेले असून आज ते एक वेगाने विकसित होणारा उद्योग बनला आहे. भारत हा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व स्थापत्य वारशाने नटलेला देश असून येथे विविध कालखंडांतील कला व स्थापत्य कलेची परंपरा आढळते. मौर्य, गुप्त, राष्ट्रकूट, पल्लव तसेच मध्ययुगीन इस्लामी काळातील स्थापत्य कलेतून स्तूप, मंदिरे, गुंफा, स्तंभ, मीनारे व मकबरे यांची निर्मिती झाली. अजिंठा-वेरूळ, सारनाथ, महाबलीपुरम, कुतुबमिनार, ताजमहल इत्यादी ऐतिहासिक स्थळे भारतीय पर्यटनाची ओळख बनली आहेत. या स्थापत्य वारशामुळे देशी-विदेशी पर्यटक आकर्षित होतात तसेच सांस्कृतिक जतन, राष्ट्रीय अस्मिता दृढीकरण व रोजगारनिर्मितीस चालना मिळते. त्यामुळे भारतीय पर्यटन हे केवळ आर्थिक साधन नसून एक अमूल्य ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्वाचे ठरते.

Fields of Study & Subjects

Diverse Aspects of Tourism Research Religious Tourism and Spaces Travel Writing and Literature

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026