कष परयटनतन गरमवकस
Abstract
स्वातंत्र्योत्तर काळातील औद्योगिकरण व शहरीकरणामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढले. परिणामी शेतीपासून दुरावलेली नवी पिढी पुन्हा ग्रामीण जीवन, शेती व निसर्गाकडे आकर्षित होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आली. कृषी पर्यटन म्हणजे शेती आणि पर्यटन यांची सांगड घालून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणारा व पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा उपक्रम होय. या शोधनिबंधात कृषी पर्यटनाची संकल्पना, उगम, उद्देश, प्रकार, भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील स्थिती, तसेच ग्रामीण विकासातील त्याचे महत्त्व यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा, रोजगारनिर्मिती, स्थानिक संस्कृतीचे जतन, पर्यावरणपूरक व शाश्वत विकास साध्य होऊ शकतो. तसेच शहरी लोकांना ग्रामीण जीवनशैलीचा अस्सल अनुभव मिळतो. शासन, स्थानिक समाज व शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून कृषी पर्यटन ग्रामीण विकासाचा प्रभावी मार्ग ठरू शकतो, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
Fields of Study & Subjects
Rural development and sustainability
Community-based Tourism Development and Sustainability
Regional Development and Management Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026