परयटन कषतरत मरगदरशकच भमक
Abstract
पर्यटन क्षेत्राचा वेगाने होत असलेला विस्तार पाहता पर्यटन मार्गदर्शकाची (टूर गाईड) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मार्गदर्शक हा केवळ माहिती देणारा व्यक्ती नसून तो पर्यटक आणि पर्यटनस्थळ यांच्यातील प्रभावी दुवा, सांस्कृतिक प्रतिनिधी व विश्वासू सहकारी असतो. पर्यटनस्थळांचा इतिहास, संस्कृती, परंपरा, कला, वास्तुकला व भूगोल यांची अचूक व रंजक माहिती देऊन मार्गदर्शक पर्यटकांचा अनुभव समृद्ध करतो. प्रवासाचे योग्य नियोजन, वेळ व्यवस्थापन, सुरक्षिततेची काळजी, आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि संवाद सुलभता यांमुळे पर्यटन अधिक सुरक्षित व संस्मरणीय बनते. या अभ्यासात पर्यटन मार्गदर्शकाची संकल्पना, पात्रता, आवश्यक कौशल्ये, आचारसंहिता, विविध प्रकारचे मार्गदर्शक तसेच पर्यटनातील त्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यटन मार्गदर्शक जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देतो, पर्यावरण व सांस्कृतिक वारशाचे संरक्षण घडवून आणतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतो. त्यामुळे पर्यटनाच्या दर्जोन्नतीसाठी, देशाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी व शाश्वत पर्यटन विकासासाठी मार्गदर्शकाची भूमिका अनन्यसाधारण आहे, असा निष्कर्ष या लेखातून मांडण्यात आला आहे.
Fields of Study & Subjects
Diverse Aspects of Tourism Research
Hospitality and Tourism Education
Community-based Tourism Development and Sustainability
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026