परभण जलहयतल परयटन आण ऐतहसक वरस सथळ
Abstract
पर्यटन हे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासाचे महत्त्वपूर्ण माध्यम असून धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनाला भारतात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठवाडा विभागातील परभणी जिल्हा हा प्राचीन धार्मिक परंपरा व समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. या लेखात परभणी जिल्ह्यातील पर्यटन व ऐतिहासिक-धार्मिक वारसा स्थळांचा अभ्यास करण्यात आला आहे. जिल्ह्यातील धारासूर, जांब, चारठाणा, लोहार (श्री तपेश्वर महादेव) तसेच इतर धार्मिक स्थळे ही स्थापत्य, शिल्पकला व धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. या वारसा स्थळांमुळे धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनाला मोठा वाव असून त्यातून स्थानिक रोजगारनिर्मिती, आर्थिक विकास व सांस्कृतिक जतन साध्य होऊ शकते. मात्र अनेक स्थळांकडे दुर्लक्ष, पडझड व अपुऱ्या सुविधा आढळून येतात. त्यामुळे वारसा संरक्षण कायदे, जनजागृती, योग्य पायाभूत सुविधा, मार्गदर्शक व माहिती फलकांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. योग्य संवर्धन व व्यवस्थापन झाल्यास परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित होऊन सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यास मोलाची भूमिका बजावतील, असा निष्कर्ष या अभ्यासातून मांडण्यात आला आहे.
Fields of Study & Subjects
Religious Tourism and Spaces
Archaeology and Cultural Heritage
Urbanism
Landscape
and Tourism Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026